माणसाने
माणसाने पहिल्या प्रथम स्वतःलापुर्ण अंशाने उध्वस्त करून घ्यावेचरस गांजा ओढावा
अफ़ीम लालपरी खावी
मुबलक कंट्री प्यावी
याला त्याला कुणालाही आयभयणीवरूनगाली द्यावी, धरून पिदवावे
मर्डर करावा, झोपलेल्यांची कत्तल करावी
पोरीबाळीम्शी सइंद्रिय चाळे करावे
म्हातारी म्हनू नये,तरनी म्हणू नये
कवळी म्हणू नये,सर्वांना पासले पाडावे
व्यासपिठावर समग्र बलात्कार घडवून आणावे
येशुच्या,पैगंबराच्या, बुद्धाच्या विष्णुच्या वंशजांना फ़ाशी द्यावे
देवले मशिदी शिल्पे म्युझियम कुस्करून टाकावे
हे सारे विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावे
अनामवेळी फुटू द्यावे ,रिचू द्यावे.
नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये
काळा गोरा म्हणू नये
तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शुद्र असे हिणवू नये
अभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी माणून
त्यांच्या कुशीत गुण्यागोविंद्याने राहावे
चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी कांडून खावा
माणसावरच सुक्त रचावे
माणसाचेच गाणे गावे माणसाने.
चिमणी
देवांच्या भाकड कथांचा समुद्र
गढूळ्लेल्या अपऱंपार लाटा
गुडघाभर पाण्यात उभी चिमणी
नाकातोंडात जाते पाणी
कालपऱवा शाळेतून ती आली
चिलयाची गोष्ट सांगू लागली
देव येवढे का दुष्ट का असतात.
चिलयाचे रक्त, मांस मागतात
मी ऊरी दुभंगतो
अक्राळ विक्राळ देवांचा जबडा
चिमणीचा का घास घेतो ?
दया पवार
(कोंडवाडा)
वाट
पायाखालची सावली
माझ्यावर कधीच रुसली नाही
तिनं फक्त एकदाच विचारलं
“ही वाट कधी संपेल रे?”
प्रा. लक्ष्मण तांबोळी
सांगेन मी केव्हातरी
डोळ्यात माझ्या धार का सांगेन मी केव्हातरी
झालेत वैरी यार का सांगेन मी केव्हातरी
आताच माझी “ती” कथा नाही बरे झेडायची
झाले फुलांचे वार का सांगेन मी केव्हातरी
पेलीत होतो मी कधी काटेच काटे जीवनी
आता फुलेही भार का सांगेन मी केव्हातरी
होती जरी तेव्हा मनी जग निंकण्याची शकयता
ही घेतली मघार का सांगेन मी केव्हातरी
नाराज नाही जीवना मी आजही रे तूजवरी
झालो तुला बेजार का सांगेन मी केव्हातरी
टी. के. जाधव
नागपूर
देणा-याने देत जावे
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी
वेयापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
प्रुथ्वीकडून होकार घ्यावे
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हत घ्यावे
विंदा करंदीकर
वामांगी
देवळात गेलो होतो मध्ये
इथे विट्ठल काही दिसेना
रख्माय शेजरी नुस्ती वीट
मी म्हणालो
रख्माय तर रख्माय
कुणाचा तरी पायावर डोकं ठेवायचं
पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून
आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला,दिसत नाही.
रख्मा म्हणाली
कुठं गेला म्हणजे?
उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला?
मी परत पाह्यलं
खात्री करून घ्यायला
आणि म्हणालो
तिथं कुणीही नाही
म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा कमीच दिसतं
दगडासारही झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडे जर होत नाही.
कधी येतो कधी जातो
उठं जातो काय करतो
मला आही काही माहीत नाही
खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजुला असे विठू
म्हणून मी बावळट
उभी राहिले
आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही?
आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
आट्ठावी युगांचं एकटेपण!
अरूण कोलटकर
खेळ
तसे पाहिले तर…केवळ भ्रमातच होतो आपण आजवर;
‘माकडाचे माणूस होता आले’ म्हणून.
पण शेवटी…सत्य एवढंच….
पूर्वजांच्या पूण्यसंचितानं म्हणा;
की स्वकर्तुत्वानं….
फक्त मूठभर लोकांनाच ‘मदारी’ होता आलं;
इतर केवळ ‘माकडं’च राहिली.
तशी दिसत नाही कुणालाच…
आमच्या गळ्यात असलेली अदृश्य दोरी;
आणि इशाऱ्यांवर नाचणारे पाय…
तरीही शेवटी… सत्य एवढंच…
आजवर केवळ भ्रमातच होतो आपण;
‘माकडाचे माणूस होता आले’ म्हणून.
सुमति वानखडे
वीज
नसतेच तसे ते काही
ते साधे काही बाही
धागाच जयाला नाही
ज्यातून परंतु प्रवाही
कशी वीज होत ही राही?
वाऱ्याने पान हलणे
पानाला केवळ कळणे
ते तसेच नुसते बघणे
डोळ्यांना केवळ कळणे
ज्यातून परंतु प्रवाही
कशी वीज होत ही राही
मंगेश पाडगावकर
पाऊलचिन्हे
मी एक रात्रि त्या नक्षत्रांना पुसले
“परमेश्वर नाही घोकत मन मम बसले
परि तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी
का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले?
तो आहे किंवा नाही कुणा न लागे ठाव
प्रज्ञेची पडते जिथे पांगळी धाव
गवसे न किनारा, फिरे जरी दर्यात
शतशतकांमधुनी शिडे उभारून नाव!”
स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही
“तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे-
त्यांनाच पुससि तू, आहे की तो नाही!”
कुसुमाग्रज
आयुष्य आणले नाही!
मी दुःख भोगण्यासाठी आयुष्य आणले नाही!
वा मरण सोसण्यासाठी आयुष्य आणले नाही!
मी जन्मलो त्या रात्री दुःखाशी सौदा केला,
ते दुःख टाळण्यासाठी आयुष्य आणले नाही!
मी कधी तोडले नाही अश्रुंचे माझे नाते
अन् केवळ हसण्यासाठी आयुष्य आणले नाही!
जुलमांच्या वस्तीमध्ये मी कितीतरीदा हरलो
पण मागे वळण्यासाठी आयुष्य आणले नाही!
भाऊ पंचभाई (हुंकार वादळांचे)